ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुजरात किनारपट्टीजवळ भारतीय समुद्र क्षेत्रात प्रवेश केलेल्या एका पाकिस्तानी मच्छिमाराला बोटीसह पकडण्यात आले. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गस्तीदरम्यान शनिवारी संध्याकाळी सर क्रीक परिसरात ही कारवाई केली. आज सकाळी सुरक्षा दलाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.
खालिद हुसेन (वय 35) असे अटक केलेल्या मच्छिमाराचे नाव आहे. तो पकिस्तानच्या सिंध भागातील रहिवासी आहे.
बीएसएफने एका निवेदनात म्हटले आहे की, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.५० वाजता समुद्राची स्थिती आणि कमी दृश्यमानता यामुळे भारतीय हद्दीतील सर क्रीकच्या भागात पोहचलेल्या पाकिस्तानी मच्छिमाराला बोटीसह पकडण्यात आले. त्याच्याकडून २० लिटर डिझेल, एक मोबाईल फोन, दोन मासेमारीच्या जाळ्या, प्लास्टिकचे आठ गठ्ठे आणि काही खेकडे जप्त करण्यात आले आहेत.