वृत्तसंस्था /बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील बुधवारी येथे झालेल्या 105 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलगु टायटन्सचा 34-32 अशा दोन गुणांच्या फरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात यूपी योद्धाने तामीळ थलैवाजवर 41-39 असा विजय मिळविला.
बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स संघातील बचावफळीत खेळणारा कबड्डीपटूने गिरीश इमाकची कामगिरी दर्जेदार झाली. दोन्ही संघांनी या सामन्यात दर्जेदार खेळ करत शेवटच्या मिनिटापर्यंत चुरस निर्माण केली होती. शेवटच्या पाच मिनिटामध्ये तेलगु टायटन्सच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्यात अपयश आले. या सामन्यातील विजयामुळे गुजरात जायंट्सचा संघ प्ले ऑफच्या समीप पोहोचला आहे.
दुसऱया सामन्यात यूपी योद्धाने तामीळ थलैवाजवर 41-39 अशा केवळ दोन गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळविला. यूपी योद्धा संघातर्फे प्रदीप नरवाल आणि सुरिंदर गिल यांची कामगिरी दर्जेदार झाली.