ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एखाद्या चौकाचे, शहराचे नाव बदलण्यासाठी नेतेमंडळी उत्सुक असतात. मात्र, गुजरातमध्ये तर चक्क फळाचे नाव बदलण्यात आले आहे. संपूर्णदेशात आणि जगभरात ड्रॅगन फ्रूट नावाने प्रसिद्ध असलेले फळ गुजरातमध्ये ‘कमलम’ (कमळ) म्हणून ओळखले जाणार आहे.
फळाला ड्रँगन शब्द वापरणे चांगले नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखे दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम असे देण्यात आले आहे, असे सांगण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली आहे.
दरम्यान, ड्रॅगन फ्रूट प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे या कोरोना संकटात या ड्रॅगन फ्रुटला अधिक मागणी आहे. ड्रॅगन फ्रूट हे दोन प्रकारचे असते. यामधे एक पांढरे आणि एक लाल असे प्रकार आहेत. पांढऱ्या पेक्षा लाल फळाला अधिक मागणी असते.