ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या रिपोर्ट वरून हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची काल तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली होती. त्यांना थोडा ताप आणि सर्दी झाली असल्याने त्यांची आज सकाळी कोरोनाची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचे रिपोर्ट काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आताच काही वेळापूर्वी रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात ते निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे.
दरम्यान, दिल्लीत कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून दिल्लीने ही संख्या 27 हजार पार केली आहे. तर आता पर्यंत 700 पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे दिल्लीत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.