प्रतिनिधी / बेळगाव
गुढीपाडव्यानिमित्त नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-बेंगळूर या मार्गावर विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याला गावी येणाऱया प्रवाशांची सोय व्हावी तसेच सध्या सुरू असलेल्या बस संपामुळे गर्दी होऊ नये यासाठी दोन विशेष रेल्वे धावणार आहेत.
यशवंतपूर-बेळगाव रेल्वे क्रमांक 06547 ही रेल्वे दि. 9 रोजी रात्री 10.15 वाजता यशवंतपूर येथून निघणार आहे. दुसऱया दिवशी सकाळी 9.10 वाजता बेळगावला पोहोचेल. बेळगाव-यशवंतपूर रेल्वे क्रमांक 06548 ही रेल्वे दि. 14 रोजी रात्री 10 वाजता बेळगाव येथून निघून सकाळी 8.40 वाजता यशवंतपूर येथे पोहोचणार आहे.
यशवंतपूर-बेळगाव रेल्वे क्रमांक 06557 रेल्वे दि. 10 रोजी रात्री 10.15 वाजता यशवंतपूर येथून निघून दुसऱया दिवशी सकाळी 9.10 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. बेळगाव-यशवंतपूर रेल्वे क्रमांक 06558 ही रेल्वे दि. 11 रोजी रात्री 10 वाजता बेळगाव येथून निघून सकाळी 8.40 वाजता यशवंतपूर येथे पोहोचणार आहे.