क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
खनगाव खुर्द येथे गुढी पाडव्यानिमित्त सालाबादप्रमाणे खळय़ाच्या कुस्त्या साधेपणाने मोठय़ा उत्साहात पार पडल्या. दरवषी गुढी पाडव्यानिमित्त खनगाव खुर्द येथे मोठय़ा कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. पण कोरोना महामारीमुळे या वर्षीचे मैदान साधेपणाने घेण्याचा निर्णय कुस्ती संघटनेने घेतला. त्यानुसार लहान कुस्त्या घेण्यात आल्या. या कुस्त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुस्ती परंपरा खंडित न होता ती सतत चालू ठेवण्याचा ध्यास खनगाव कुस्तीगीर संघटनेने घेतला आहे, त्यानुसार यावषी कुस्त्या पार पडल्या.