प्रतिनिधी / कोल्हापूर
राजकिय, सामाजिक जीवनात नैतिकता जपली पाहिजे मग तो धनंजय मुंडे असो की विजय भोजे पण एखाद्यावर गुन्हा नोंदवला गेला म्हणजे त्याला लगेच आरोपीच्या पिंजऱयात उभे करणे योग्य नाही. भोज यांच्याविषयीची सखोल आणि निपक्षपणे चौकशी करावी, वस्तुस्थिती समोर येवू देत त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल. मुंढे प्रकरणातही भाजपने अशीच भूमिका घेतली आहे. असे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.