आपल्या आजूबाजूची परिस्थिती अतिशय विस्कळीत आहे. सगळीकडे गुन्हेगारांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. पण दहशतीपोटी कुणीही पुढे येत नाही आणि सगळा अन्याय मुकाटय़ाने सहन करतात. अशावेळी एक व्यक्ती या गुन्हेगारांचा नाश करण्याचा निश्चय करते. त्याची कथा किंग्ज मॅन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मॅथ्यू वॉन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राल्फ फिनेस, गेमा आर्टन, मॅथ्यू गुड, टॉम हॉलॅण्डर, हॅरिस डिकिन्सन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
-संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई