आदित्य रॉय कपूरसोबत चित्रिकरणास प्रारंभ
अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकुर लवकरच तमिळ हिट चित्रपट थडमच्या हिंदी रिमेकमध्ये दिसून येणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाला आता ‘गुमराह’ हे नाव दिल्याचे समजते. सत्य घटनांवर आधारित या क्राइम थ्रिलर चित्रपटात आदित्य दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे. तर मृणाल ही एका पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारणार आहे.
आदित्य अन् मृणाल आणि रोनित रॉय हे या चित्रपटाच्या मुंबईतील चित्रिकरणात सामील झाले आहेत. या चित्रपटातील माझी भूमिका वेगळी आहे. पोलीस अधिकाऱयाची भूमिका आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निश्चितच वेगळी असणार असल्याचे मृणालने म्हटले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्धन केतकर करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी पेलली आहे. 2019 मध्ये प्रर्शित मागीज थिरुमेनी यांच्याकडून दिग्दर्शित थडम या चित्रपटात अरुण विजय, तान्या होप आणि स्मृती वेंकट आणि विद्या प्रदीप यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या जीवनावर आधारित पिप्पा या चित्रपटात मृणाल ही ईशान खट्टरसोबत मुख्य भूमिकेत लवकरच दिसून येणार आहे. मृणाल यापूर्वी जर्सी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.