ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या 13 दिवस आगोदर हरियाणा सरकारने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. आता तो सुनारिया तुरुंगातून बाहेर येऊ शकणार आहे. राम रहीम सध्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात हरियाणातील रोहतक तुरूंगात शिक्षा भोगत आहे.
पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीपूर्वी गुरमीत राम रहीमच्या सुटकेकडे एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून पाहिले जात आहे. कारण पंजाबमध्ये 300 हून अधिक मोठे डेरे आहेत. जिथे राम रहीमचा प्रभाव आहे. त्यामुळे सरकारने त्याला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी राम रहीमला आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अनेक वेळा इमर्जन्सी पॅरोल देण्यात आला होता.