ऑनलाईन टीम/तरुण भारत
हरियाणाच्या गुरूग्राम शहरात गेल्या महिनाभरापासून उघड्यावर नमाज पठन करण्यावरून वाद सुरू आहे. बंजरंगदल सारख्या काही हिंदूत्वादी संघटनांसह स्थानिकांनी मोकळ्या जागेवर नमाज पठण करणाऱ्या मुस्लीम सामुदायाचा विरोध केल्याने, वाद निर्माण झाला होता. महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी या वादाची चर्चा असायची, मात्र शुक्रवारच्या नमाजसाठी गुरूद्वारांच्या स्थानिक संघटनेने बुधवारी आपले दरवाजे उघडण्याची घोषणा केली. गुरुद्वारा सिंग सभा समितीने पुढाकार घेऊन संबंधित पाच गुरुद्वारांमध्ये मुस्लिमांना नमाज पठण करण्याची परवानगी घेण्यासाठी प्रशासनाकडे संपर्क साधणार असल्याचे सांगितले. कोविड नियमांचे पालन करत लहान गटांमध्ये नमाज पठन होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.