खानापूर तालुका शिक्षक संघटनेचा उपक्रम
खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने शनिवारी गुरुवंदना कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या अनेक शिक्षकांचा तसेच बेळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने प्राप्त गुरुजनांचा सत्कार समारंभ पार पडला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शालेय मुलींच्या ईशस्तवनाने झाले. प्रस्तावना बी. एम. येल्लूर यांनी केले.
यावेळी गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षक व मुख्याध्यापक यांचा यावेळी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावषी शिक्षक दिनी खानापूर तालुक्मयातील शिक्षकांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या त्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खानापूर तालुक्मयातील सहा शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा शिक्षण विभागाच्या अंतर्गत मराठी भागातील तीन तसेच जिल्हा पंचायत अंतर्गत कन्नड विभागातील दोन अशा एकूण पाच शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यामध्ये मराठी प्राथमिक लोअर शाळा विभागातून ढोकेगाळी मराठी शाळेचे सहशिक्षक एन. एम. करंबळकर यांना तर हायर प्राथमिक मराठी शाळा विभागातून गणेबैल शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांना व माध्यमिक शाळा विभागातून नंदगड-आनंदगड विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एम. देसाई यांना या वषीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्याप्रमाणे कन्नड विभागातून मंग्यानकोप शाळेचे सहशिक्षक आय. जे. बागवान, सुरपूर-केरवाड शाळेचे सहशिक्षक बजंत्री यांना हा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानित शिक्षकांचा यावेळी तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांच्या हस्ते शैक्षणिक योजनांची माहिती देणाऱया एका वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच या वेबसाइट अंतर्गत शिक्षकांच्या पगार संदर्भात पेस्लीप देखील या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. सदर वेबसाईट तालुका शिक्षक संघाचे संचालक पी. जी. पाखरे यांनी तयार केले असून त्याचा शिक्षकांना चांगलाच लाभ होणार आहे.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी शिक्षकांनी सुधारीत शिक्षण पद्धतीकडे लक्ष देत आपल्या सेवेत पारदर्शकता राखावी, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेला हा पुरस्कार म्हणजे ज्ञानार्जनाचे एक प्रतीक आहे. शिवाय अनेकवर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले शिक्षक हे शैक्षणिक कथेचा खरा पाया असल्याचे उद्गार त्यांनी काढले. यावेळी सत्कारमूर्ती एस. टी. पाटील, बागवान यांचीही भाषणे झाली. अध्यक्षस्थानावरून बोलताना वाय. एम. पाटील यांनी शिक्षकांची सेवाही अमूल्य असून त्यांच्या कार्याची पोचपावतीही आदर्श शिक्षक पुरस्कार आतून मिळते. गुरुवंदना कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारा हा पुरस्कार त्या शिक्षकांचा मान उचावणारा ठरतो. यासाठी प्रत्येकाने आपली सेवा बजावताना प्रामाणिकपणे बजावण्यास निश्चित फळ असते. असे उद्गार काढले. कार्यक्रमाला अनेक सेवानिवृत शिक्षक, अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.