वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय फुटबॉल गोलरक्षक गुरूप्रित सिंगने आपल्या सरावाला सिडनीमध्ये प्रारंभ केला आहे. एसी मिलानचा माजी गोलरक्षक कॅलेकच्या मार्गदर्शनाखाली गुरूप्रित सिंगने आपला सराव सुरू केला आहे.
आगामी वर्षीच्या फुटबॉल हंगामासाठी भारतीय संघात गुरूप्रित सिंग संधुला पहिले प्राधान्य दिले जाईल. कॅलेकच्या मार्गदर्शनाखाली आठवडय़ातून दोनवेळा संधु फुटबॉलचा सराव करीत आहे. 25 मार्च रोजी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने गुरूप्रित सिंग संधु याचे वास्तव्य सिडनीमध्ये आहे. इंंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत संधु हा बेंगळूर एफसी संघाचा गोलरक्षक आहे. सिडनीमधील विविध गोलरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संधुने गेल्या तीन-चार आठवडय़ापासूनच आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे.