प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये एसटीचा संप सुरू असताना गुरूवारी रत्नागिरी विभागाला तब्बल 4 लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाल़े एसटीच्या फेऱयाच्या संख्या वाढत असतानाच प्रवासी संख्याही वाढली आह़े गुरूवारी 15 हजार 955 प्रवाशांची नोंद करण्यात आल़ी सर्वाधिक उत्पन्न दापोली आगारातून प्राप्त झाले आह़े रत्नागिरी आगारातून रत्नागिरी-कोल्हापूर बस सोडण्यातही एसटीच्या अधिकाऱयांना यश आल़े
जिह्यात आता एकूण 689 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान संप सुरू असतानाच जिह्यात मंगळवारी 300 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर अनेक कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत काही कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ हजर कर्मचाऱयांमध्ये 256 प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा 182, चालक 74, वाहक 62, चालक तथा वाहक 33 उपस्थित असून 82 कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत़
16 डिसेंबरचे आगारनिहाय उत्पन्नः
आगार उत्पन्न रूपयांमध्ये
मंडणगड 5,058
दापोली 103,216
खेड 51,980
चिपळूण 62,074
गुहागर 874
देवरूख 76,377
रत्नागिरी 1020
लांजा 9,105