प्रशासनाला 4 हजार 324 अहवालांची प्रतिक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
गुरूवारी कोरोना रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली आहे. बेळगाव शहर व जिह्यातील 40 जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला असून यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 20 जणांचा समावेश आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 742 वर पोहोचली आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 17 व ग्रामीण भागातील 3 असे तालुक्मयातील 20 जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. आणखी 4 हजार 324 अहवालांची प्रशासनाला प्रतिक्षा आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिह्यात 272 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत 25 हजार 127 जणांनी कोरोनावर मात केली असून 341 जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्यातील 2 लाख 96 हजार 192 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 2 लाख 64 हजार 523 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 37 हजार 578 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
सांबरा एटीएमसमधील आणखी एका जवानाचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. येळ्ळूर, कंग्राळी, रामतीर्थनगर, टिळकवाडी, देवराज अर्स कॉलनी-बसवणकुडची, जाधवनगर, गुरूप्रसाद कॉलनी, हालगा येथे पॉझिटिक्ह रुग्ण आढळून आले असून बिम्स्मधील एका कर्मचाऱयाचाही अहवाल पॉझिटिक्ह आला आहे.