ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये आज दुपारी लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले. इंंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावपथके दाखल झाली आहेत.
एसडीएम गुरेझ यांनी सांगितले की, बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात आज दुपारी लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर गुजरन नाल्यात कोसळले. एका आजारी बीएसएफ जवानाला घेऊन या हेलिकॉप्टरने टेक ऑफ केले होते. त्यानंतर लगेचच या हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वैमानिक आणि सह-वैमानिक यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून ते या अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. या बर्फाळ प्रदेशात बचावपथके दाखल झाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.