चिपळूण मुर्तवडेतील घटना, पाचजणांवर गुन्हा
चिपळूण
शेतात गुरे शिरल्याच्या कारणावरुन दोन गटांत मारामारी झाल्याची घटना गुरुवारी रात्री 7 वाजता तालुक्यातील मुर्तवडे-कुटलवाडी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून त्यानुसार दोन्ही गटांतील एकूण 5जणांवर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात एका गटातील अंकुश लक्ष्मण निवाते (35, मुर्तवडे-कुटलवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रतिभा प्रभाकर गुजराथी, प्रसाद प्रभाकर गुजराथी, प्रविण प्रभाकर गुजराथी (मुर्तवडे-कुटलवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा, प्रसाद व प्रविण यांनी अंकुश याची गुरे दुसऱयाच्या भातशेतीत सोडली. यामुळे अंकुश हा या तिघांना विचारण्यासाठी गेला असता यातील प्रतिभा हिने त्यास कानफटात मारली. तसेच प्रसाद व प्रविण यांनी शिविगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच प्रसाद याने अंकुशच्या पत्नीची मॅक्सी फाडली..
तसेच प्रतिभा प्रभाकर गुजराथी (55, मुर्तवडे-कुटलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळील शेतात अंकुश लक्ष्मण निवाते व अनुशा अंकुश निवाते यांची गुरे शिरली होती. त्यावेळी त्यांनी अनुशा हिला हाक मारुन याची माहिती दिली. त्यावेळी अंकुशने धमकी देत शिविगाळ केली. याची विचारणा पकेली असता त्याने प्रतिभा यांना काठीने मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रतिभा यांचा मुलगा प्रसाद हा भांडण सोडवण्यास आला असता त्यालाही काठीने मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी अंकुश व अनुशा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.