बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनानंतरचे जग आणि जीवन कसे असेल? या विषयावर गुलमोहर बाग आर्टीस्ट ग्रुपने विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अ गटात पार्थ कालेकर (पुणे) याने प्रथम क्रमांक, रितूपर्णा मोहंती (भुवनेश्वर) व अनय रस्तोगी (मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. याच गटात पूर्वा बंगार (पुणे), परणिका दिवाणे (पुणे) व अंतरा मरडी (बेळगाव) यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.
तसेच ब गटात ट्विंकल अगरवाल (चंदीगढ) यांनी प्रथम, श्रुती दत्ता (कोलकाता) यांनी द्वितीय, अभिनव शेट्टी (बेळगाव) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. आदित्य बामिष्टे (पुणे), शुभम द्विवेदी (पुणे), मोरफस्त नाग (चंदीगढ) यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
पहिल्या गटात जजिस अवॉर्ड सर्टिफिकेट मुस्कान नहाटा (बेंगळूर), हनिया (धारवाड), सहना पै (बेंगळूर), चार्मी जैन (मुंबई). तसेच ब गटात चार्वि बी. (बेंगळूर), असावरी भोसेकर (नांदेड), पुर्बिता पट्टनायक (रूरकेला), अभिक्षिता पौल (हॉवर्ड) यांना जाहीर झाले.
या ऑनलाईन स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध चित्रकार शरद तरडे व सुचिता तरडे यांनी काम पाहिले. एकूण 900 स्पर्धकांनी पाठविलेल्या चित्रांतून दुसऱया फेरीसाठी 100 चित्रांची निवड करण्यात आली. त्यातून 20 चित्रे बक्षिसासाठी निवडली गेली.
या स्पर्धेबाबत आणि चित्रांबाबत परीक्षक शरद तरडे म्हणाले, एकूण चित्र पाहता मुलांना सध्याच्या परिस्थितीतून शक्मयतो लवकर बाहेर पडावयाचे आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीने थक्क करण्याइतकी उत्तम चित्रे रेखाटली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी बक्षिसाचा विचार न करता चित्रकलेचा सराव कायम ठेवावा. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ऑनलाईन पद्धतीने शनिवार दि. 5 रोजी होणार आहे. परीक्षा यशस्वी होण्यासाठी गुलमोहर बागच्या सर्व चित्रकार सदस्यांनी परिश्रम घेतले.