40 वर्षांपासून रंगावर करत होती प्रेम
लोक स्वतःच्या पसंतीच्या रंगाची कार खरेदी करताना, ड्रेसेस घेताना पाहिले असेल, परंतु एका महिलेने स्वतःच्या पसंतीच्या रंगासोबत विवाह केला आहे. अमेरिकेतील एका महिलेने स्वतःच्या पसंतीच्या रंगासोबत विवाह करून सर्वांना चकित केले आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी तिने हा विवाह केला आहे.
या महिलेचे नाव किटेन काय सेरा असून ती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहते. तिने स्वतःच्या पसंतीच्या गुलाबी रंगासोबत लास व्हेगासमध्ये विवाह केला आहे. या विवाहसोहळय़ात सर्व काही गुलाबी रंगाचे होते. तिने स्वतःचे केस देखील गुलाबी रंगात रंगवून घेतले होते. या विवाहात गुलाबी गाउन, गुलाबी कोट आणि गुलाबी टियारामध्ये सेराने गुलाबी रंगासोबत विवाह केला आहे.
एक मुलगा ठरला कारणीभूत
2 वर्षांपूर्वी एका मुलाने गुलाबी रंगावरून तिची थट्टा केली होती. स्केटबोर्डवरील एका मुलाने गुलाबी रंगासोबत विवाह का करत नाही अशी विचारणा थट्टेच्या सूरात केली होती. मुलासोबतच्या संभाषणानंतर सेराच्या मनात गुलाबी रंगासोबत विवाह करण्याचा विचार जागा झाला. मागील 40 वर्षांपासून गुलाबी रंगासोबत नात्यात असल्याचे तिचे म्हणणे आहे. सेराने गुलाबीच्या 5 शेड्सयुक्त स्वॅचसोबत विवाहाचे विधी पूर्ण केले आहेत.
विवाहाची थीम
तिच्या या विवाहसोहळय़ात प्रत्येक जण गुलाबी रंगाचे कपडे घालून आला होता. या सोहळय़ाची कलर थीम देखील गुलाबीच होती. विवाहाची रिंग देखील गुलाबी रंगाचीच होती. सेराने विवाहावेळी अखेरच्या क्षणापर्यंत गुलाबी रंगाचे कपडे परिधा करण्याची शपथ घेतली आहे.