व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमिवर उत्पादकांना मोठा फटका : पालिहाऊसधारकांच्या आडचणीत वाढ
सागर लोहार / व्हनाळी
बाजारातील वाढलेली गुलाब फुलांची आवक, कोरोनाचा फटका आणि कृत्रिम फुलांची मागणी यामुळे गुलाब फुलांचे दर कोसळले असून यंदा 10 वर्षातील सर्वात निचांकी दर राहिल्याने व्हॅलेंटाईन डेला मोठी आर्थिक उलाढाल होईल, या आशेवर असलेल्या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचा चेहराच कोमेजला आहे. लॉकडाऊन आणि बॅंकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे अडचणीत आलेल्या पालिहाऊसधारकांचे बजेट पुर्ण कोलमडले आहे.
जिल्ह्यात सुमारे 256 पालिहाऊसधरक शेतकरी असून त्यातील 50 टक्के शेतकरी गुलाबाचे उत्पादन करतात. सरकारच्या एकात्मीक फलोत्पादन विकास योजने अंतर्गत अनेक शेतकरी व युवक नोकरीच्या मागे न लागता गुलाब शेतीकडे वळवले आहेत. परंतू आवकाळी पाऊस, वातावरणात होणारे वारंवारचे बदल आणि कोरोना, या सर्वामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला आला आहे. अनेकांनी कर्जे घेवून पालिहाऊस उभारली आहेत. त्यातच गतसालातील आनुदान रखडले आहे. बॅंकानी मात्र व्याज आणि वसुली थांबवलेली नाही.
या कठीण परिस्थीतीही शेतकऱ्यांनी व्हॅलेंटाईन डे गुलाबाला चांगला दर मिळेल आणि आर्थिक मदत होईल, या आशेने नियोजन केले आहे. खते, औषधांवर खर्च करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही गुलाबावर किडीने हल्ला केलाच. त्याच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक, मजूर, इंधनाची दरवाढ, खते, औषधे आणि फुलाच्या पॅकिंगच्या साहित्याच्या वाढलेल्या किमती याच विचर करता फुलाला चांगला दर अपेक्षीत आहे. पण बाजारात 20 फुलांच्या एका बंडलचा दर पाहता उत्पादन खर्च देखील निघणे जिकरीचे होवून बसले आहे. गतसाली 180 ते 200 असणारा फुलांच्या बंडलचा दर आज 80 ते 90 रूपये आहे. तर बेंडींगची लहान फुले देखील 3 ते 4 रूपयावरून 1 रूपयाला 1 फुल असा दर झाला आहे.
जिल्ह्यात 5 कोटीचा फटका
गतसाली कोल्हापूरातील फुले गोवा, रत्नागिरी, कणकवली, चिपळूण, हैद्राबाद, बेंगलोर, मुंबई, जयपूर, सावंतवाडी आशा ठिकाणी गेली होती. त्यातून एका शेतकऱयाला जानेवारी ते 14 फेब्रुवारी या दिड महिन्यात 5 ते 6 लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले होते. पंरतू यावषी त्यातील 25 टक्केही उत्पन्न मिळाले नाही. जिल्ह्यात सव्वाशे पालिहाऊसधारक शेतकऱयांचा 75 टक्मयाने तोटा धरल्यास तोट्याचा आकडा 5 कोटीवर जातो. जरबेरा फुल उत्पादकांची आवस्थाही यापेक्षा वाईट आहे. 15 ते 16 रूपयाला असणारे लाकडाऊननंतर 50 पैसे ते 1 रूपयाला झाले असून आणि ते गुलाबापेक्षा स्वस्त असल्यामुळे बुकेमध्ये जरबेरा फुलांची संख्या वाढली आहे.
व्हॅलेंटाईन डे चे नियोजन केल्याने उत्पादन वाढले पण मागणीच घटल्यामुळे वर्षभराचा पालिहाऊसचा खर्चदेखील आंगावर बसला आहे.
शिवाजी पाटील, गुलाब उत्पाक शेतकरी, पाडळी. ता. हातकणंगले.
20 फुलांच्या एका बंडलचा दर गतसाली 180 ते 200 होता. यंदा 80 ते 90 रूपये आहे. बेंडींगची लहान फुले 3 ते 4 रूपयावरून 1 रूपयाला विकली जातात.