वार्ताहर / बांबवडे
खोतवाडी (ता. शाहूवाडी) येथील राजाराम बंडू खोत (वय 40) याने गोगवे येथील गुऱहाळ घरातील गुळाच्या उकळत्या काहिलीत उडी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची माहिती अशी, खोत हा तालुक्मयातील एका गुऱहाळावर कामासाठी होता. तो गुरुवारी सुट्टी असल्याने गावी आला होता. पण गावाला जातो असे सांगून तो घरातून निघून गेला होता. शनिवारी तो गोगवे येथील पूर्वीच्या गुऱहाळावर आला. अचानकपणे त्याने गुळाच्या उकळत्या काहिलीत उडी घेतल्याने त्याच मृत्यू झाला. शवविच्छेदन मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील, हवालदार संभाजी पाटील करत आहेत