वाळपई / प्रतिनिधी
गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या नियोजित येणार असलेल्या नियोजित आयआयटी प्रकल्पाचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. मंगळवारी गुळेली पंचायतीच्या मंडळाने याप्रकल्पाच्या सभोवताली कुपंणाच्या बांधकामाचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर बुधवारी संबंधित भागांमध्ये व भुमापन करण्यासाठी अधिकारी येण्याची शक्मयता असल्याने पुन्हा एकदा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामध्ये मोठय़ा प्रमाणात महिला भगिनी सहभाग दर्शविला.
गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन सुरूच आहे. गुळेली याठिकाणी साडेतीन हजार कोटी खर्चून आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याप्रकल्पामुळे आमच्या शेती बागायतीवर गदा येण्याची भीती असल्यामुळे या प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. वेगवेगळय़ा स्तरावर आंदोलने करण्यात येत आहेत. अनेकवेळा पोलिस स्थानकावर व पंचायतीवर मोर्चा नेण्यात आला होता. मंगळवारी या प्रकल्पासाठी सभोवताली कुंपण घालण्यासाठी ना हरकरत दाखल्याचा प्रस्ताव फेटाळण्य़ात आला. बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून हे आंदोलन रस्त्यावर बसून भू मापन करण्यासाठी येणाऱया पथकाला विरोध करण्याच्या दृष्टीकोनातून आंदोलन करीत होते. मात्र शेवटपर्यंत हे पथक न आल्यामुळे त्यांनी दुपारी घरी जाणे पसंत केले.