प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर तालुक्यातील असगोली येथे घराबाहेरील शेडचे काम सुरू असताना यामध्ये शॉक लागून 40 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 4 च्या दरम्यान घडली. यामध्ये दोन कामगारही किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची खबर सायंकाळी उशिरा गुहागर पोलीस ठाण्यात देण्यात आली.
रमेश भिकाजी पालशेतकर असे मृत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते हेदवी माध्यमिक हायस्कूलवर शिक्षक होते. मंगळवारी घराजवळील शेडचे वेल्डींगचे काम सुरू होते. यामध्ये विजेचा शॉक लागून ही घटना घडली. त्यांना तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्या ठिकाणी ते मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी असे मोठे कुटुंब आहे.