ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अफगाणातील अशरफ घनी सरकारची महत्त्वाची माहिती तालिबानी दहशतवाद्यांच्या हाती येऊ नये, यासाठी गूगलने घनी सरकारची सर्व इमेल अकाउंट लॉक केली आहेत.
15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून तालिबान अशरफ घनी सरकारच्या काळातील संवेदनशील माहिती वेगवेगळय़ा स्रोतांच्या माध्यमातून गोळा करण्याचे काम करत आहे. घनी सरकारचे भारतासह अमेरिका, ब्रिटन यासारख्या अन्य देशांसोबत चांगले संबंध होते. जगातील अनेक देशांकडून शेअर केलेली माहिती दहशतवाद्यांच्या हाती येऊ नये, तसेच गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱयांनी गोळा केलेली माहिती दहशतवाद्यांना मिळू नये, यासाठी गूगलने घनी सरकारची सर्व इमेल अकाउंट लॉक केली आहेत. दरम्यान, सुरक्षा तज्ञ चाड अँडरसन यांनी गूगलचे हे पाऊल पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे.