ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जोकर मालवेअरने संक्रमित असलेले 6 ॲप्स गूगलने प्ले स्टोरमधून डिलिट केले आहेत. तसेच हे ॲप वापरणाऱ्या 2 लाखांहून अधिक युजर्सला हे ॲप्स अनइन्स्टॉल करण्यास सांगण्यात आले आहे.
गूगल प्ले स्टोरने कन्विनियन्ट स्कॅनर 2, सेफ्टी ॲपलॉक, पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस, इमोजी वॉलपेपर, सेप्रेट डॉक स्कॅनर आणि फिंगरटिप गेमबॉक्स हे ॲप्स हटवले आहेत. जोकर मालवेअर डिव्हाईसमध्ये आल्यानंतर यूजर्सला प्रीमियम सर्व्हिससाठी कोणत्याही माहितीशिवाय सब्सक्राईब करुन देतात. त्यामुळे हे ॲप्स हटवण्यात आले आहेत.
गूगलने 2017 पासून जोकर मालवेअरने संक्रमित असलेले 1700 ॲप्स प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.