ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सोबतच दोघांचा फोटोही शेअर केला आहे, ज्यात अनुष्का गरोदर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
विराट कोहली आपल्या ट्विट मध्ये म्हणाला की, ‘ आणि… आम्ही तीन होणार! जानेवारी 2021 मध्ये (बाळाचे) आगमन होणार, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
सध्या विराट कोहली आयपीएल खेळण्यासाठी दुबईला गेला आहे. विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती.