ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेचा गृहपाठ न केल्यामुळे एका पित्याने आपल्या मुलाला पंख्याला उलटे लटकावले. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी बुंदी जिल्ह्यातील दाबी येथे घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी एका आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार करताना दिसत आहे.
घटनेनंतर मूल आणि त्याची आई चित्तौडगडच्या जोगनियामाता भागात गेले आणि त्यांनी आपल्या मामाला व्हिडिओ दाखवला. यानंतर महिलेच्या भावाने चाइल्ड लाइनला फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. पण या घटनेबाबत अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आरोपीच्या हिंसक स्वभावामुळे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यास घाबरत असल्याची माहिती आहे.