सातारा / प्रतिनिधी
खेळण्यासाठी बागडत घराबाहेर पडलेली 7 वर्षांची चिमुरडी घरी परतलीच नाही…दुस-या दिवशी घरी परतला तो बलात्कार होऊन चिरफाड झालेला तिचा मृतदेहच… या गोष्टीची अक्षरश: चीड येत आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आता तरी खडबडून जागं व्हावं. सतत अशा प्रकारच्या घटना घडताहेत तेही साताऱ्यात विशेषत: पॉक्सोच्या..त्यात या चिमुरड्या गरोदर राहून लहान वयात त्यांची प्रसुती होत आहेत…या गोष्टीची लाज वाटली पाहिजे आपल्याला..तस्च या घटनेतील आरोपीला फाशीचं झाली पाहिजे…व इतरही प्रलंबीत केसेस मध्ये ही फाशीचं व्हावी अशीही मागणी चित्रा वाघ यांनी केली.