मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उद्योग व्यवसाय प्रभावित झाले असून घरातील गृहिणी किंवा महिला आपल्या फावल्या वेळेत शेअर बाजारात गुंतवणुक करत असल्याची बाब समोर आली आहे.
सध्याला बँकांच्या मुदत ठेवींवर व्याजदरही कमालीचे घटले आहेत. तसेच इतर गुंतवणुकीत फायदा नसल्याने महिला गुंतवणूकीचे अन्य मार्ग पडताळताना दिसत आहेत. अधिकतर महिला शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत असे दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात महिलांनी घरातला स्वयंपाक केल्यानंतर उरलेल्या फावल्या वेळेचा चांगला उपयोग करून घेतला आहे.
बऱयाचशा महिलांनी शेअर बाजाराचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. यातील काहींनी तर गुंतवणूकही केली असल्याचे सांगण्यात येते. एका महितीनुसार एप्रिल ते जून 2020 या काळात मागच्या तिमाहिच्या तुलनेत डिमॅट खाते उघडण्यात महिलांचे प्रमाण 32 टक्क्यांनी वाढले आहे. यातील 70 टक्के महिला शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत.