वृत्तसंस्था /मुंबई
आपण जर सॅमसंग स्मार्टफोन्स वापरकर्ते असाल तर आपल्यासाठी एक खूषखबर आहे. सॅमसंगने आपल्या गॅलक्सी एफ 62 स्मार्टफोनची किमत 6 हजारांनी कमी केली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एफ सिरीज अंतर्गत येणारा स्मार्टफोन्स स्वस्त करण्यात आला आहे. यातील गॅलेक्सी एफ-62 ची किमत 6 हजार रुपयांनी घटविण्यात आली आहे. सदरचा स्मार्टफोन याचवर्षी जानेवारीमध्ये कंपनीने भारतीय बाजारात सादर केला होता. या स्मार्टफोनला पंच होल डिस्प्ले व क्वॉड कॅमेराची सुविधा असून ऑक्टाकोर प्रोसेसरही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 7000 एमएएच इतक्या दमदार क्षमतेची आहे.
सदरच्या स्मार्टफोनची किमत 23,999 रुपये इतकी होती. ती आता घटवून 17,999 रुपये इतकी करण्यात आली असून यामध्ये 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोअरेजची सोय असणार आहे. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोअरेजच्या फोनची किंमत आता 19,999 रुपये इतकी असणार आहे. याआधी या फोनची किंमत 25,999 रुपये इतकी होती. लेजर ब्ल्यू, लेजर ग्रीन व लेजर ग्रे या रंगामध्ये सदरचा स्फार्टफोन खरेदी करता येणार आहे.