बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण कन्नडच्या बंटवाळ येथे एका कारला गॅस टँकरने समोरासमोर धडक दिल्याने सहा जण जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी पहाटे पनेमंगळूर भागात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जखमी झालेल्या सर्व सहा जण एका इको व्हॅनमध्ये किनिगोळीच्या इकला गावी जात होते. तीर्थयात्रेनंतर ते मंदिरातून परत येत होते यावेळी हा अपघात झाला,” असे त्यांनी सांगितले आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.