औरंगाबाद पोलिसांनी बिहारमधून घेतले ताब्यात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील तरुणाला एलपीजी गॅसची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने 5 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घालणाऱया तरुणाला अटक करण्यात आली आह़े नितीशकुमार जितेंद्रसिंग प्रसाद (26, ऱा नवादा बिहार) असे संशयिताचे नाव आह़े औरंगाबाद पोलिसांनी त्याला बिहार येथून अटक केली असून तपासामध्ये त्याने रत्नागिरी तालुक्यातील वायंगणी येथील तरुणाला फसविल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आह़े..
औरंगाबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नितीशकुमार याने दिल्ली येथील सॉफ्टवेअर कंपनीच्या मदतीने बनावट सरकारी वेबसाईट तयार केली होत़ी या वेबसाईटच्या माध्यमातून नितीशकुमार हा एलपीजी गॅसची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने पैसे उकळत अस़े अशीच फसवणूक रत्नागिरी वायंगणी येथील संतोष प्रभाकर बिडू (55, ऱा वायंगणी फाटा रत्नागिरी) यांची झाली होत़ी हा प्रकार बनाव असल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार 4 एप्रिल 2020 रोजी संतोष यांनी मोबाईलवर एलपीजी गॅस डिलरशीपसंदर्भात जाहिरात पाहिली होत़ी डिलरशीप मिळविण्यासंदर्भात त्यांनी आपला भाचा विवेक सुर्वे व वैभव सुर्वे (ऱा जयगड- रत्नागिरी) यांच्याशी चर्चा केल़ी डिलरशीप घेण्याचे नक्की झाल्यानंतर तक्रारदार यांनी भाचा वैभव सुर्वे याच्या पत्नीच्या नावाने ऑनलाईन अर्ज केल़ा 8 एप्रिल रोजी आशिष नावाच्या इसमाने तक्रारदार यांना फोन करून तुम्हाला डिलरशीप देण्याचा निर्णय झाला आह़े मात्र सुरुवातीला 7 हजार 500 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा करावे लागतील, असे आशिष याने सांगितल़े
डिलरशीप मिळण्याच्या लोभातून तक्रारदार यांच्या मुलाने संबंधित खात्यामध्ये 7 हजार 500 रुपये जमा केल़े यानंतर डिलरशीप सर्टिफिकेटसाठी 64 हजार 900, एनओसी सर्टिफिकेटसाठी 96 हजार 400 गॅस सिलिंडर डिपॉझिटसाठी 3 लाख 52 हजार रुपये खात्यामध्ये जमा करा, असे आशिष नामक इसमाकडून सांगण्यात आल़े दरम्यान वेळोवेळी फोनवर झालेल्या संभाषणातून तक्रारदार यांचा विश्वास बसल्याने त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व रक्कम खात्यात जमा केल़ी डिलरशीपसंबंधी मोबाईलवर पाठवण्यात आलेली कागदपत्रे तक्रारदार यांनी चेंबूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे पाठवल़ी ही कागदपत्रे बोगस असल्याचे कंपनीकडून तक्रारदार यांना कळविण्यात आल़े दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार बिडू यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होत़ी
संशयिताला रत्नागिरी पोलिसांकडे देणार
संशयित आरोपी याने रत्नागिरीत तरुणाला गंडा घातल्यासंदर्भात रत्नागिरी पोलिसांना कळविण्यात आले आह़े संशयिताची कोठडी संपल्यानंतर त्याला रत्नागिरी पोलिसांकडे देण्यात येईल़