ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आज पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर आता 819 रुपयांना मिळणार आहेत. गॅस दरातील ही वाढ अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन्ही सिलेंडरला लागू असेल, असे पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटले आहे.
फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तीन वेळा वाढवण्यात आल्या होत्या. 4 फेब्रुवारी रोजी 25 रुपयांची, 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची तर 25 फेब्रुवारीला पुन्हा 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मागील महिन्यात गॅसचे दर 100 रुपयांनी वाढले होते. आज मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस दरात 25 रुपयांची वाढ केली.
19 किलो कमर्शियल सिलेंडर दरातही 90.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीत हा सिलेंडर 1614 रुपयांना मिळणार आहे.