अचानक लागलेल्या आगीने परिसरात पसरले भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/ सातारा
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या चौकात असणाऱया एका चहाच्या टपरीला मंगळवारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. मात्र ही आग तात्काळ आटोक्यात आणल्याने कोणताही अनर्थ घडला नसून फारसे नुकसान झाले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथील सदरबझार परिसरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. याठिकाणी जिह्याच्या कानाकोप्रयातून अनेक नागरिक वाहनांसंबंधी कामासाठी रोज येत असतात. कार्यालयाच्या बाहेर जिल्हा रुग्णालय मार्गाच्या कडेला नागरिकांसाठी चहा, वडापाव, भजी, नाष्टय़ाची सुविधा असणाऱया अनेक टपऱया टाकण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी दुपारी यापैकी एका टपरीत घरगुती गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. यामुळे आगीचे डोंब उठू लागले. ही आग बघताच परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्याने जाणारे वाहनधारक, ग्राहक यांनी गर्दी करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेजारील इमारतीत असणाऱया पोर्टेबल फायर दिस्टिंगविशर आणून आग विझविण्याचे प्रयत्न केला. तो पर्यंत सातारा नगरपरिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण टपरी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही दुखापय झाली नाही. घरगुती गॅस चे अनियंत्रित वापरामुळे अश्या घटना घडत आहेत. या टपऱयावर सर्रास घरगुती गॅस वापरला जातो. कोणीही कमर्शियल गॅस वापर नाही. आणि अन्न व औषध खाते, जिल्हा पुरवठा खाते डोळे बंद करून पहात असल्याचे चित्र दिसत आहे