ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारी इंधन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात 73.5 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापराच्या सिलेंडरसाठी आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये मुंबईत 72.50 रुपयांची वाढ झाली असून, मुंबईत हा सिलेंडर 1579.50 रुपयांना मिळेल. दिल्लीत 73 रुपयांची वाढ झाली असून, तो 1623 रुपयांना झाला. कोलकात्यात 72.50 रुपयांची वाढ झाली असून, नवा दर 1629 रुपये आहे.