३०५ निगेटिव्ह, १४८ अहवाल तपासणीला
सातारा/प्रतिनिधी
आकडेवारीचा खेळ रोजच सुरू आहे. सध्या त्याला कोणी फारसे गांभिर्याने घेत नसले तरी सातारा जिल्हय़ात गेल्या 14 दिवसांतली आकडेवारी त्यातल्या त्यात समाधान कारक आहे. कोरोनाचा लुप सध्या तरी 14 दिवसांचा मानला जात असल्यामुळे जिल्हय़ात तिसरा महिना संपतानाच्या शेवटच्या लुपमध्ये बाधितांपेक्षा मुक्त होण्याचे प्रमाण दीडपटीपेक्षा कितीतरी जास्त आहे.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात 5 जण बाधित, 2 जण मुक्त, तर एक वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र 305 अहवाल निगेटिव्ह आल्याचे समाधान आहे.
देशभरातील अनलॉकची प्रक्रिया वेगाने गतीमान होत आहे. आता तर केवळ 6 दिवस राहिले असताना जिल्हय़ात मात्र गेल्या 14 दिवसांच्या कोरोनाच्या लुपमध्ये मुक्त होणाऱयांचा आकडा 230 इतका आहे तर बाधितांचा आकडा हा केवळ 142 वर राहिला आहे.
बुधवारी जिल्हय़ात 19 जण बाधित
जिल्हय़ात मंगळवारच्या रात्रीचा आलेला अहवाल हा कराड, पाटण,सातारा तालुक्यांसाठी धक्कादायक होता. कराड तालुक्यातील बनवडी 32 वर्षीय पुरूष, तारूख 25 वर्षीय महिला असे 2 जण तर पाटण तालुक्यातील शेजवळवाडी येथील 49 महिला, बोंदी 34 पुरूष त्याचप्रमाणे सातारा शहरालगत असलेल्या वाडेफाटा येथील 56 वर्षीय महिलेचा अहवाल बाधित आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार पाटण तालुक्यातील शितापवाडी 72 वर्षीय पुरूष, पाळेकरवाडी 50 व 65 वर्षीय पुरूष. कराडमधील रेठरे खुर्द 45 वर्षीय महिला, तारूख येथील 20, 40, 56, 40, 45 वर्षीय पुरूष व 7 वर्षाची मुलगी. वाईमधील कवढे 20 वर्षीय पुरूष, एकसर येथील 25 वषीय पुरूष. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथील पुरूष. सातारा तालुक्यातील लिंब गोवेमधील 36 वर्षीय पुरूष अशा एकुण 19 जणांना लागण झाल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
305 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
मंगळवारी पाठवण्यात आलेल्या अहवालांपैकी 19 जण बाधित असल्याचा अहवाल आला असला तरी 305 जण निगेटिव्ह आले आहेत. तर बुधवारी पुन्हा 148 जणांचे अहवाल तपासणीला पाठवले आहेत. त्याच प्रमाणे ओझरे ता. जावली येथील 75 वर्षीय पुरूषाचा कृष्णामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ात बुधवारपर्यंत
एकुण कोरोनाबाधित 864
एकुण कोरोनामुक्त 680
बळी 41
जिल्हय़ात ऍक्टिव्ह रूग्ण 143
बुधवारी
एकुण कोरोनाबाधित 19
एकुण कोरोनामुक्त 02
बळी 01
दिवसभरांतले निगेटिव्ह 305