ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 371 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर 8 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 19 हजार 756 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 202 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 19,756 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2142 पोलीस अधिकारी आणि 17,614 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 15 हजार 830 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1662 पोलीस अधिकारी आणि 14,168 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 3724 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 460 पोलीस अधिकारी आणि 3264 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 202 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 20 पोलीस ऑफिसर आणि 182 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.