उन्हाळ्यात डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल हवाच. तुम्हीही नवाकोरा, स्टायलिश गॉगल घेण्याचा विचार करत असाल तर या टिप्स फॉलो करा.
- यूव्ही प्रोटेक्शन देणारा म्हणजेच सूर्याच्या अतिनील किरणांना रोखणारा गॉगल खरेदी करा. उगाचच स्वस्तातला, रस्त्यावरचा गॉगल खरेदी करू नका. गॉगल फक्त स्टाईलसाठी नाही तर डोळ्यांच्या संरक्षणासाठी वापरायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा.
- उन्हाळ्यातल्या वापरासाठी मोठय़ा आकाराचा गॉगल घ्या. यामुळे डोळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीचं संरक्षण मिळेल. मोठय़हा आणि गोल आकाराच्या फ्रेमचे गॉगल घ्या.
- गॉगलच्या रंगाऐवजी लेन्सच्या दर्जाकडे अधिक लक्ष द्या.
- गॉगल खरेदी करण्याआधी त्याच्या लेन्सबाबत माहिती जाणून घ्या. यासोबतच गॉगलशी संबंधित इतर बाबीही नीट समजून घ्या.