हम मदहोश हुए आगोश में जिसकी, ‘वो दिल को चुराने वाली है’……जब होश मे आये, पत्ता चला हम पुरे फस गये है …..हनी ट्रप जो फेंका था उसने एक ऐसा……’
संजयला त्याच्या व्हॉट्सऍपवर अनुष्का नावाच्या मुलीचा मेसेज आला. मेसेजमध्ये लिहिले होते की ‘मी तुझ्या कॉलेजमध्ये होते, मला तेव्हा तू खूप आवडायचास, पण सांगायचे धाडस झाले नाही’. असा मेसेज आल्यावर संजय जरा सुखावला. मग त्याला प्रतिसाद देत ‘हो का? कुठल्या वर्गात होतीस?’ अशा पद्धतीने गप्पांना सुरुवात झाली. थोडे दिवस चॅटिंग झाल्यावर गप्पा थोडय़ा रोमँटिक स्वरुपाच्या होऊन त्याचे रुपांतर सेक्स चॅटमध्ये झाले. अनुष्काने आपले काही सेमी-न्यूड फोटो पाठवून विजयलाही तसे करण्यास सांगितले. विजयनेही आपले फोटो पाठवले. हे काही दिवस चालल्यानंतर अचानक संजयला ब्लॅकमेल करणारे फोन सुरू झाले. असेच एका श्रीमंत व्यावसायिकास जाळय़ात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हीडिओ बनवत पन्नास लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. ही अश्लील फोटो, चॅटचे रेकॉर्डिग करून ब्लॅकमेल करणे हे सोशल मीडियाद्वारे सर्रास सुरू झाले आहे. हाच तो हनी ट्रप.
हनी ट्रप कसा टाकला जातो. तर एखादी व्यक्ती त्याला हव्या असलेल्या पुरुषाला किंवा स्त्रीला प्रेमाच्या व अश्लीलतेच्या जाळय़ात पैशासाठी फसविण्याचा मार्ग म्हणजे हनी ट्रप. बनावट कॉल वापरून, प्रथम पीडित व्यक्तीची निवड केली जाते. स्त्री किंवा पुरुष हे दोन्ही यामध्ये सामील असतात. काही वेळा पुरुष स्त्रीला फसवतो तर काही वेळेस स्त्री पुरुषाला फसवते. एकदा का ओळख झाली की हळूहळू ते/ती त्यांच्याशी मैत्री करतात. काही काळ बोलल्यानंतर आणि आत्मविश्वास वाढविल्यानंतर, पीडित मुलीला/मुलाला अश्लील संभाषण करून चेतविले जाते व नग्न फोटो पाठविण्यास उद्युक्त केले जाते किंवा व्हीडिओ कॉल करून पीडित व्यक्तीला आपले कपडे उतरविण्यास सांगितले जाते, दरम्यान याचे कॉल रेकॉर्डिंग केले जाते आणि स्क्रीनशॉट घेतले जातात. जर पीडित व्यक्तीने कपडे काढण्यास नकार दिला तर केवळ फोटो पाठविण्यास सांगितले जाते. अगदीच त्यालाही पीडित व्यक्तीने नकार दिला तर विशि÷ पद्धतीने फोटो मागितले जाते. मिळालेले व्हीडिओ, अर्धनग्न फोटो किंवा साधे फोटो हे मॉर्फ करून नग्न दाखवून त्या पीडित व्यक्तीला धमकावले जाते आणि ब्लॅकमेल केले जाते. तसेच त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते. अशा पद्धतीला हनी ट्रप असे म्हणतात. झटपट श्रीमंत होऊन ऐषारामात जीवन जगण्यासाठी, कोणत्याही थराला जात समाजविघातक कृत्य करणारे लोक असा हनी ट्रप टाकतात. हे एकटय़ाचे काम नसून काही जणांची टोळी हे काम करते. बऱयाचदा बदनामी नको म्हणून चुपचाप पैसे दिले जातात.
याची सुरुवात होते कुठून?
फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वरून प्रेंड लिस्ट तपासली जाते. बहुतांशी युझर आपली प्रेंड लिस्ट स्ट्रॉग करण्याच्यामागे असतात त्यामुळे कोणतेही निकष न लावता रिक्वेस्ट स्वीकारली जाते. ही फेसबुक किंवा इन्स्टा वरील ओळख अडचणीत आणू शकते. सोशल मीडियावर झालेली ओळख, त्याचे मैत्रीत रुपांतर, फोनची देवाण घेवाण, अश्लील चॅटींग यामुळे हनी ट्रपचे प्रकार वाढीस लागले आहेत. सोशल मीडियावर ज्याचा प्रोफाईल स्ट्राँग आहे तो तरुण किंवा तरुणी बहुदा यांचे टारगेट बनत आहेत. प्रत्यक्षात थोडे असताना जास्त दाखवण्याच्या मोठेपणाची हौस असणारेही यामध्ये फसले जात आहेत. सुरुवातीला पोस्ट लाईक करणे मग कॉमेंट करणे या बाबीही हनी ट्रपला कारणीभूत ठरत आहेत. या ट्रपमध्ये सापडल्यास बदनामी होईल या भीतीने अनेकजण पोलिसांकडे तक्रार न करता पैसे देऊन टाकतात. यामुळेही या अशा लोकांचे फावले असून ते असे परत करण्याचे धाडस करत आहेत.
हनी ट्रप असा लावला जातो…
हे गुन्हेगार सोशल मीडिया प्रोफाईल शोधतात. टाईमलाईनवर कशा पोस्ट आहेत, कोणते फोटो आहेत याचा अभ्यास करतात. आपला एक खोटा अकाऊंट तयार करतात. स्वतःची जुजबी माहिती प्रोफाईलमध्ये भरतात. एक देखणा फोटो प्रोफाईलला लावतात. हे सर्व झाले की प्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. एखाद्याने कुतूहल म्हणून त्याला प्रतिसाद दिला, की मग गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते मग तुम्ही केलेल्या सेक्स चॅटचा, तर कधी पाठवलेल्या न्यूड फोटोंच्या बदल्यात खंडणी मागितली जाते.
स्त्रिया आणि पुरुष दोघेही या हनी ट्रपला बळी पडतात, तर बहुतेक प्रकरणांमध्ये, महिला या अपराधी तर पुरुष हे पीडित असतात. हनी ट्रपचा धोका सर्व वयोगटातील लोकांना आहे. साधारण चाळीशीतील किंवा विधवा स्त्रिया किंवा एकटेपणा जाणवणारे आणि महिला साथीदार शोधत असलेली मध्यमवयीन पुरुष हे देखील या हनी ट्रपचे बळी ठरलेले आढळतील. फेसबुकपाठोपाठ इन्स्टन्ट मेसेजिंग ऍपवरून आता ‘हनी ट्रप’मध्ये ओढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. एकदा कुणी जाळय़ात सापडला की त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात. असे काही तुमच्या बाबतीत घडल्यास न लाजता तातडीने तक्रार करा.
सतर्क कसे राहाल
आपण कोणा कोणाला ऑनलाईन भेटतो म्हणजे कोणाला मेसेज करतो याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीचे मेसेज आहेत का? ज्या व्यक्तीबरोबर आपण चॅटिंग करतो आहोत ती व्यक्ती आपल्या प्रेंडलिस्टमध्ये आहे का हे तपासणे आवश्यक आहे. थोडक्मयात अज्ञात लोकांशी मैत्री करू नका. शक्मयतो नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करू नका. आपले चॅट रेकॉर्ड होऊ शकतात किंवा जर फोटोची मागणी झाली व आपण ते पाठविले तर ते फोटो मॉर्फ करून त्याचे नग्न फोटोमध्ये रूपांतर करून ब्लॅकमेल केले जाऊ शकते. सायबर गुन्हेगारांच्या धमक्मयांना घाबरून कोणत्याही मागण्या मान्य करून पैसे देऊ नका. असे घडल्यास त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. https://cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंद करा. एक महत्त्वाचे…. असे घडल्यास घाबरून जाऊन लगेच आपल्या फोनवरील मेसेज, फोटो, व्हीडिओ किंवा कॉल लॉग डिलीट करू नका. या सर्वांचे शक्मय असल्यास स्क्रीन शॉट घेऊन ठेवा. हे सर्व पुरावा म्हणून पुढे केससाठी उपयोगात येऊ शकतात. तसेच पोलिसांना जे जे घडले आहे ते खरे सांगा. जेणे करून पोलिसांना ती माहिती तपास कामात उपयोगी होईल.
विनायक राजाध्यक्ष