पणजी : ’गोंय स्वातंत्र्याचे होमखण’या गोवा मुक्तिलढय़ावरील आधारित माहितीपटाचे अनावरण क्रांतिदिनाचे औचित्य साधून 18 जून रोजी सायंकाळी 4 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर हेही यावेळी उपस्थित असतील.
मॅकेनीज पॅलेसच्या ऍाडिटोरियम 1 मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. अनावरण झाल्यावर लगेच हा माहितीपट दाखवला जाईल. या माहितीपटासाठी प्रजल साखरदांडे यांनी संशोधन केले असून ज्योती कुंकळकर यांनी माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.