कोरोनाच्या फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न- तीन हजार कोटी उभारण्याचे संकेत
वृत्तसंस्था/मुंबई
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे हवाई उद्योग मोठय़ा प्रमाणात प्रभावीत राहिलेला आहे. यामध्ये सुधारणा आणण्यासाठी विविध टप्प्यावर प्रयत्न केले जात आहेत. सुधारणेसाठी भारतामधील खासगी विमान कंपनी गोएअर आपला आयपीओ आणण्याची योजना बनवत आहे. योजनेअंतर्गत कंपनी तीन हजार कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार आयपीओसाठी सिटी ग्रुप, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि मॉर्गन स्टॅनले यांना इन्वेस्टमेंट बँकर नियुक्त केले आहे.
एअरलाईन कंपनीमध्ये वाडिया गुपची हिस्सेदारी आहे. माध्यम अहवालानुसार आयपीओमध्ये वाडिया ग्रुपमध्ये 30 टक्क्यांची हिस्सेदारी विकली जाते. विशेष बाब म्हणजे कंपनी 2017 पासून आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. परंतु यामध्ये म्हणावे तसे यश मिळालेले नाही. गोएअरवर 31 मार्च 2019 पर्यंत एकूण 1,819 कोटी रुपयांचे कर्ज होते. जे सलगपणे वाढत जात असल्याचे चित्र आहे. या प्रवासात कोरोना महामारीचा प्रभाव राहिल्याने एअरलाईन्स कंपन्यांचा बँक निधी प्रभावित राहिला होता.