मुंबई
वाडिया ग्रुपची हवाई कंपनी गोएअर येणाऱया काळात भारतीय भांडवली बाजारात आपला आयपीओ आणणार असल्याचे समजते. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 2 हजार 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. कंपनी आपला आयपीओ पुढच्या आर्थिक वर्षात सादर करू शकते. सदरच्या उभारलेल्या पैशातून अंतर्गत खर्च भागवण्यासोबतच व्यवसाय विस्तार केला जाणार आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर आर्थिकदृष्टय़ा परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत असून पैशाची गरज भागवण्यासाठी कंपन्यांना आयपीओचा सहारा घ्यावा लागतो आहे.