वार्ताहर / घटप्रभा :
गोकाक तालुक्मयात बुधवार दि. 16 रोजी कोरोना बाधित 20 नवे रुग्ण आढळून आले असून गोकाक नगरातच 5 नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गोकाक नगरातील विविध वॉर्डात 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर यादवाड गावात 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोळवी गावात 2, खनगाव 1, एम. मल्लापूर 1, घटप्रभा 1, शिंदीकुरबेट 1, मरडीमठ 1, मुडलगी 1, कुलगोड 1 असे एकूण 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
नव्या रुग्णांना गोकाक येथील सरकारी हॉस्पिटलच्या गोकाक कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, असे प्रसिद्धी पत्रकातून प्रसिद्ध केले आहे.