प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकी संदर्भात संचालक मंडळाच्यावतीने पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर सोमवार 8 रोजी सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराच्या आदेशानुसार निवडणूक 31 मार्ज पर्यंत स्थगित करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. गोकुळच्यावतीने ऍड. जहागिरदार व सुरेल शहा काम पहात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळावी, असा विनंती अर्ज गोकुळच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केला होता. यावर मंगळवार 2 रोजी सुनावणी होवून न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्य केल्याने अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरु झाली. मात्र शुक्रवारी नव्याने याचिका दाखल केल्याने काय होणार याकडे लक्ष वेधले आहे. या निर्णयावरच 8 मार्च निर्णय आणि पुढील प्रक्रिया अवलंबून आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत थांबवल्या. मात्र यातून न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळण्यात आल्या. केर्ली ता. करवीर येथील जोतिर्लिंग दूध संस्थेने गोकुळ निवडणूक तत्काळ घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने 10 फेब्रुवारीला निर्णय दिला.