प्रतिनिधी / कोल्हापूर:
गोकुळच्या निवडणुकीत कोरोनाचा पाठलाग सुरुच असून आणखी एक ठरावधारक कोरोनाचा बळी गेला. राजाराम शिवाप्पा हेगाण्णा बुबनाळ (ता. शिरोळ) असे त्यांचे नाव आहे. विकास सहकारी दूध संस्था बुबनाळचे ते ठरावधारक होते. दोन दिवसापूर्वी डोणोली (ता. शाहुवाडी) येथील सुभाष पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. लागोपाठच्या या घटनांमुळे ठरावधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेगाण्णा यांना त्रास जाणवू लगल्याने त्यांना जयसिंगपूर येथील खासगी इस्पितळात दाखल केले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता अखेर मंगळवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले.