प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने संचालकांच्या वतीने केलेला विनंती अर्ज मंगळवारी मागे घेतला. त्यामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरुच राहणार यावर शिक्कामोर्तब झाले असून 8 मार्चला प्राप्त हरकतींवर निर्णय होवून 12 मार्चला अंतिम सभासद यादी प्रसिद्ध होणार आहे. तर एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे च्या पहिल्या अठवडÎात मतदान होण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.
गोकुळ निवडणुकीसंदर्भात केर्ली ता. करवीर येथील जोतिर्लिंग दूध संस्थेने निवडणूक तत्काळ घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने 10 फेब्रुवारीला निर्णय दिला होता. तर शासनाच्या निर्णयानुसार सर्वच सहकारी संस्थांची 15 फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती.
दरम्यान कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु झाल्याने राज्य सरकराकडून विविध उपाययोजना सुरु केल्या. 50 पेक्षा अधिक लोक एकत्रीत येवू नयेत याची खबरदारी घेतली गेली. निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली. मात्र सहकार प्राधिकरणाने न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरुच राहणार असे स्पष्ट केले. जोतिर्लिंग संस्थेच्या अपिलावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आल्याने संभ्रम तयार झाला होता. याबाबत स्पष्टता करावी, शासनाच्या आदेशानुसार निवडणुकीला स्थगिती मिळावी. अशी मागणी संघाच्यावतीने उच्च न्यायालयात केली होती. मंगळवारी न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि बिस्त यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता निवडणुका थांबविता येणार नाहीत .कोरोना सोबत रहायला हवे असे स्पष्ट करत प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे संचालक मंडळाने याचिका मागे घेतली.
12 मार्चला अंतिम यादी
सहकार विभागाच्या आदेशानुसार गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरु असून 3659 पैकी 3654 ठराव निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत. यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर मंगळवारी विभागीय दुग्ध निबंधक सुनिल शिरापूरकर यांच्या समोर 16 संस्थांची सुनावणी झाली. आणखी दोन दिवस सुनावणी होणार असून 8 मार्चला निर्णय होणार असून 12 मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
या संस्थांची सुनावणी पूर्ण
क्रांती दूध उंचगांव (निगडेवाडी), गुंडु पाटील परिते शाहुनगर, जयभवानी बानगे, ता. कागल, शाहू हणबरवाडी, ता.कागल, सुलोचना एकोंडी, ता. कागल, जय भवानी महिला सोनगे, ता. कागल, वागजाई पणुत्रे, ता. पन्हाळा, भैरवनाथ आळवे, ता. पन्हाळा, दत्त वेतवडे, ता. पन्हाळा, इंदिरा, माजगांव, ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर जयभवानी वाघवे, ता. पन्हाळा, मिनाताई ठाकरे, माजनाळ, ता. पन्हाळा, येसाबाई महिला, दरेवाडी, ता. पन्हाळा, हनुमान, सावर्डे/सातवे, ता. पन्हाळा, पावनाई, केर्ले, ता. शाहुवाडी, गांगोबा, नांदगांव, ता. शाहुवाडी
अडचण काहीच नाही
निवडणूक व्हावी ही आमचीही इच्छा आहे. परंतु जिल्हÎातील एक हजाराहून अधिक संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या. मग गोकुळवरच का अन्याय. आमच्या मतदारांना कोविडचा धोका नाही का? म्हणून याचिका दाखल केली होती. परंतु आज ही याचिका मागे घेतली. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक झाली तरी
सत्ताधाऱयांना काहीच अडचण नाही. नेत्यांच्या पातळीवर समझोता सुरू आहेत. तरीसुध्दा आम्ही जुन्या सहकाऱयांची मोट बांधून निवडणुकीस तयार आहोत. –चेअरमन रविंद्र आपटे
परिर्वतणातून शेतकऱयांना न्याय देणार
निवडणूक घ्यावी म्हणून आम्ही न्यायालयात गेलो होतो. सत्ताधाऱयांनी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले. परंतु न्यायालयाचा रोख ओळखूनच आज याचिका मागे घेतली. गेल्या चार-पाच वर्षापासून दूध उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. आमची भुमिका घेवून मतदारांपर्यंत पोहचणार आहे. परिवर्तनाच्या माध्यमातून शेतकऱयांना निश्चितच न्याय मिळणार आहे.
पालकमंत्री सतेज पाटील