प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गोगवे शितकरण केंद्राच्या नवीन उभारलेल्या 2 लाख लिटर क्षमतेच्या अद्यावत रेफ्रिजेशन प्लान्टचे उद्घाटन चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच वाढीव विद्युत लोडच्या ट्रान्सफॉर्मरचे व क्युबीकल मिटरींग रूमचे उद्धाटन माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांचे हस्ते कण्यात आले.
संघाचे चेअरमन पाटील म्हणाले, `सध्या चिलिंग सेंटरकडे दररोज एक लाख लिटर दूधाचे संकलन होत असुन पुढील काळात दूध संकलन दोन लाख लिटर पर्यंत वाढविणेचा मानस असल्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, संभाजी पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, गोगवे शाखा प्रमुख सुनील पाटील तसेच चिलिंग सेंटरकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शाखा प्रमुख सुधाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिलीप गवळी यांनी आभार मानले.