अमरसिंह पाटील, डॉ सुजित मिणचेकर तर बयाजी शेळके विजयी
प्रतिनिधी/कोल्हापूर
सर्वसाधारण गटातील मतमोजणीला प्रारंभ. अधिक अपडेटसाठी लिंकवर क्लिक करा https://tarunbharat.com/dailynews/974873
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे इतर मागास उमेदवार अमरसिंह पाटील हे ४३६ मतांनी विजयी झाले. मागासवर्गीय उमेदवार डॉ सुजित मिणचेकर हे ३४६ मतांनी तर बयाजी शेळके हे 239 मतांनी विजयी झाले. महिला प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चुरस असून सुमारे १०० मतांचे मताधिक्य घेतले आहे.
महिला गटातून विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर तर सत्ताधारीमधून शौमिका महाडिक विजयी झाल्या आहेत. विरोधी पॅनेलच्या अंजना रेडेकर 184 मतांनी विजयी. त्यांना एकूण 1872 मते मिळाली. तर सतारूढ पॅनेलच्या शौमिका महाडिक या 46 मतांनी विजयी झाल्या. त्यांना एकूण 1769 मते मिळाली. आरक्षित गटातील पाच जागांपैकी 4 जागांवर विरोधी आघाडीला यश मिळाले आहे. तर केवळ एक जागेवर सत्ताधाऱ्यांना समाधान मानावे लागले.
डॉ सुजित मिणचेकर ३४६ मतांनी विजयी (व्हिडिओ) https://www.facebook.com/713001395400181/videos/1076803226179568
महिला गटातून अंजना रेडेकर यांनी प्रतिस्पर्धी अनुराधा पाटील यांच्यावर दीडशे मताची आघाडी घेतली आहे. तर शौमिका महाडिक, अनुराधा पाटील आणि सुष्मिता पाटील यांच्यात केवळ तीन ते चार मतांचा फरक आहे. आतापर्यंत तेराशे 50 मते मोजून पूर्ण झाली आहेत. मतमोजणी महिला गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
गोकुळच्या निवडणुकीसाठी गटातील मतमोजणीला प्रारंभ झाला असून महिला ओबीसी अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीच्या दिशेने कौल दिसू लागला आहे. आरक्षित जागांचा मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विरोधी आघाडीच्या पाच ही जागा आघाडीवर आहेत. आरक्षित गटातील महिला अनुसूचित जाती नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि भटक्या विमुक्त गटातील मतमोजणी 18 टेबलवर ती एकाच वेळी करण्यात येत आहे.
एक ते नऊ टेबल वरती पहिल्या वर्गातील मतमोजणी होणार आहे. दहा, अकरा, बारा या टेबल वरती ओबीसी गटातील मतमोजणी, टेबल 13, 14, 15 भटक्या-विमुक्त तर 16, 17, 18 या तीन टेबल वरती अनुसूचित जाती प्रवाहाची मतमोजणी सुरु आहे.
मतमोजणी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये 18 टेबलवर ही मतमोजणी सुरू आहे. सात वाजून पन्नास मिनिटांनी स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या बाहेर काढण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.