-मुंबई व भोकरपाडा येथे 324 कोटींचा प्रकल्प होणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्यातील सहकार वर्तुळाचे लक्ष लागलेले जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच कमालीच्या शांततेत पार पडली. मुंबई आणि भोकरपाडा येथील जागा खरेदीसह 324 कोटी रुपये खर्चाच्या विस्तारीकरणास सभेत ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. याच बरोबर जनावरांचा विमा उतरण्यासह स्वर्गीय आनंदाराव पाटील चुयेकर यांच्यावरील चित्रफित तयार करण्याची घोषणा चेअरमन विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केली. सभेला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गोकुळमधील सत्तांतरानंतर पहिली वार्षिक सभा तर विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेपूर्वी सत्ताधाऱयांवर गंभीर आरोप केले या पार्श्वभूमीवर सभेकडे शेतककऱयांचे लक्ष लागले होते. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दुपारी 1 वाजता सभेस सुरवात झाली.
चेअरमन विश्वास पाटील यांनी स्वागत करुन आढावा घेतला ते म्हणाले, संघाची वार्षिक उलाढाल अडीच हजार कोटींची आहे. अहवाल सालात म्हैस दुधास सरासरी 48.47 पैसे तर गायीच्या दुधास 30.87 पैसे दर दिला आहे. सर्वाधिक दूध दर देणारा गोकुळ राज्यात नंबर तर देशात दोन नंबरचा संघ आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी जे काही करता येणे शक्य आहे ते करु असा विश्वास देत ते म्हणाले, कर्मचाऱयांना 17 कोटी 28 लाख रुपये बोनस देण्यात येतो. उत्पदाकांना वेगवेगळÎा सुविधांतून वर्षाला 28 कोटी 78 लाख रुपये दिले जातात. संस्था कर्मचाऱयांनाही दिलासा दिला आहे, त्यांना 25 कोटी 55 लाख रुपये अनुदान दिले आहे. सभासद भविष्य कल्याण निधीसाठी 15 कोटी 19 लाख रुपये तरतुद आहे. दररोज सरासरी 14 लाख लिटर दूध संकलन होते. सध्या 53 टक्के म्हैस तर 47 टक्के गायीचे दूध संघाकडे येते. गतवर्षी पेक्षा संकलनात वाढ झालेली आहे. भविष्यात 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा परिस्थिती पूर्ण करणार आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर दूध उत्पादकांना पुरस्कार देण्यात येतात. दुधाची प्रत चांगली रहाण्यासाठी 35 गावांमध्ये 71 बल्क कुलर आहेत. हे करत असताना पशुधनाचीही काळजी आम्ही घेत आहोत. 46 फिरत्या दवाखान्यातून 68 पशुवैद्यक सेवा बजावत आहेत. तसेच 406 सेवा केंद्रे असून यावर 18 कोटी 55 लाख रुपये खर्च केले जातात. अहवाल सालात साडेसहालाख जनावरांची नोंद झाली आहे. जनावरांसाठी अद्यावत प्रयोगशाळा आहे. दररोज 20 लाख लिटर दूध हातळणी होऊ शकते असा अद्यावत प्रकल्प सध्या उभारला आहे. मुंबई, भोकरपाडा येथेही विस्तारीकरण करण्यातयेणार आहे. पुढील सभा ऑफलाईन घेऊ असे आश्वासनही शेवटी त्यानी दिले.
अहवाल वाचन बोर्ड सेक्रेटरी सदाशिव पाटील यांनी तर विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी केले. सभेत सर्व विषय एकमताने मंजूर केले. आभार ज्येष्ठ संचालक अरुण डेंगळे यांनी मानले.