गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
संचारबंदी लागू असतानासुद्धा मुंबई वाशी येथून पॅसेंजर आणून कणेरी फाटा येथे सोडल्याबद्दल गोकुळ शिरगाव पोलिसांनी गोकुळ दूध संघाचा टँकर जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांच्या वर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ दूध संघाच्या टँकर मुंबई वाशी येथून आला असताना यामध्ये सनतकुमार बापुसो मगदूम राहणार रुकडी तालुका हातकणंगले याने संपूर्ण देशभर व महाराष्ट्र तसेच जिल्हा बंदी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी चा आदेश असताना सुद्धा आपल्या स्वतःच्या लोभापायी यामध्ये रोहित सदाशिव पाटील राहणार कनेरी तालुका करवीर यास आपल्या टँकरमधून आणल्याबद्दल या दोघांच्या वर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी दुधाचा टँकर जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव पवार यांनी दिले आहे. पुढील तपास सपोनि सुशांत चव्हाण करीत आहेत.